GSA स्कुलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा



(धरणगाव|प्रतिनिधी) धरणगाव : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण आणि देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, मुख्याध्यापिका नाजनिन शेख, शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिक्षका पूनम कासार यांनी भारत देशाचा जाज्वल्य इतिहास आणि महापुरुषांच्या कार्याची माहिती त्यांच्या प्रास्ताविकपर मनोगतातून दिली. तद्नंतर अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्यांच्या मनोगतातून आणि देशभक्तीपर गीतांतून भारत देश, देशाची महानता, स्वातंत्र्यसंग्राम, क्रांतीवीरांचे बलिदान, देशाचा ज्वलंत इतिहास यावर प्रकाश टाकला. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून इयत्ता १० वी तील कुणाल चव्हाण आणि अंजली बडगुजर यांना अनुक्रमे हेड बॉय व हेड गर्ल ची जबाबदारी देऊन सन्मानित करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरण, देशभक्तीपर घोषणा, देशाचा मान अभिमान म्हणजेच आपला राष्ट्रध्वज, देशप्रेम यामुळे आजचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, हर्षाली पुरभे, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, सुनिता भालेराव, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील हे शिक्षकवर्ग तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम कासार यांनी केले.

0/Post a Comment/Comments