जळगाव : आज रोजी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद कडून समान नागरी कायदा व मणिपूर येथे आदिवासी समाजावर होत असलेल्या अत्याचाराचा विरोधात व ओबीसी जात जतनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणी साठी भारत बंद पाळण्यात आला होता.त्या पार्श्वभूमीवर जळगावात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,अश्या विविध सामाजिक संघटनांच्या वतीने देखील भारत बंदला समर्थन मिळाल्याने हजारोच्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र ६ आकाशवाणी चौक येथे रास्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधात प्रचंड घोषणा बाजी करत रोष व्यक्त केला. रास्ता रोको आंदोलन केल्याने रस्त्यावर वाहनांची मोठ्या लाईन लागल्या होत्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत डीटेंशन करून तदनंतर सोडून देण्यात आले.यावेळी आंदोलनात प्रतिभा उबाळे, राजू खरे, सुमित्र अहिरे, डॉ. शाकीर शेख,सुनील डेहदे,विजय सुरवाडे,मोहन शिंदे,यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते
Post a Comment