स्वातंत्र्य दिनी हिसारमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळल्याची संतापजनक घटना ; पोलिसांनी दोघांना पकडले


(हरियाणा|हिसार) : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संविधान निर्माते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो समाजकंटकांनी जाळल्याची संतापजनक घटना हरियाणा राज्यातील बुढाखेडा गावात उघडकीस आली आहे. यासंदर्भात अधिक असे की  स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दोन समाजकंटक तरुणांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा पोस्टर फोटो बुढाखेडा गावातील एका मोकळ्या जागेत लाऊन जाळतानां व्हिडिओ व्हायरल करत विटंबना केली.सोशल मीडीयावर व्हिडिओ व्हायरल होत असून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.जातीवादी मानसिकता असणाऱ्या लोकांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम हरियाणा राज्यात होत आहे.या आधी हिंसाचार होऊन मोठी घटना काही दिवसापूर्वी घडली आहे.या घटनेने व्यथित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी उकलाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर पेटवून ते व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर जाळल्याप्रकरणी  उकलाना पोलिसांनी  बुढाखेडा येथील बिजेंद्र आणि सुरेंद्र या दोन आरोपींना अटक केली असून दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.


 

0/Post a Comment/Comments