तुषार सावंत यांच्या आजोबांचे मरणोत्तर देहदान



(धरणगाव|प्रतिनिधी)  धरणगाव : तालुक्यातील चमगाव येथील मूळ रहिवासी व सध्या पथराड येथे वास्तव्यास असलेले ग.स.सोसायटी जळगाव चे माजी संचालक स्व.देवराम अर्जुनराव सावंत (वय - ९२) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूनंतर बाबांचा देह वैद्यकीय महाविद्यालयास देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला.'मरावे परी किर्तीरूपी उरावे' या उक्तीप्रमाणे आजोबांनी २०२१ मध्ये डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा देहदानाचा फॉर्म भरलेला होता. आपलं शरीर मेल्यानंतर देखील कोणाच्या तरी कामी यावे, हा खूप महान विचार आहे. आज सकाळी ११ वाजता अंत्ययात्रेचा औपचारिक कार्यक्रम आटोपून बाबांचा देह वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात आला. पारंपरिक रूढी परंपरांना छेद देऊन एक आगळा वेगळा आदर्श समाजासमोर सावंत कुटुंबाने घालून दिला. स्व.देवराम बाबा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत यांचे आजोबा होते. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पुरोगामी विचारांचा सतत प्रचार आणि प्रसार केला जातो. आजच्या या घटनेतून फक्त मौखिक नाही तर कृतीयुक्त आदर्श रुजविण्याचं काम या निमित्ताने झालं. सावंत कुटुंबियांनी केलेल्या कृतीतून इतरांनी देखील प्रेरणा घ्यावी आणि बाबांच्या आत्म्यास सदगती लाभावी हिच अपेक्षा.

0/Post a Comment/Comments