दोघांच्या बैठकीचं कारण त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे : यशोमती ठाकूर

अमरावती : काल शरद पवार आणि अजित पवारांची  लपून छपून बैठक झाली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. विविध चर्चांना देखील उधाण आले आहे. यावर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राज्यात सध्या संभ्रम पसरविला जात आहे. आजवर महाराष्ट्र पुरोगामी राहिला आहे. अजित पवारांचं सत्तेत जाणं खुप लोकांना आवडलेले नाही. शेवटी काम करताना विचारधारा हा महत्त्वाचा विषय आहे. दोघांच्या झालेल्या बैठकीचे कारण त्यांनीच स्पष्ट केलं पाहिजे अशा पद्धतीने राज्याला दुखविणे बरोबर नाही. असं मत यशोमती ठाकूर यांनी बोलतांना व्यक्त केले . 

0/Post a Comment/Comments