(धरणगांव|प्रतिनिधी) धरणगांव : शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन व बक्षिस वितरण समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एस.एस.सी.बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी किर्ती वसंत सैंदाणे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समारोहाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन होते. प्रमुख अतिथी समाजसेवक सुखदेव महाजन, माजी मुख्याध्यापक एस डब्ल्यू पाटील, एम के महाजन, एस आर महाजन, पी.के.रोकडे, आर.बी. पाटील, पत्रकार धर्मराज मोरे, रवि महाजन, प्रभुदास जाधव,अविनाश बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते देवा महाजन, धर्मराज पाटील, विनायक महाजन, टोनी महाजन, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, माता-पालक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या वतीने सर्व सन्माननीय मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.स्वागत गीताने समारोहाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले. मान्यवरांच्या हस्ते वर्ग १ ली ते वर्ग ९ वी, एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच मागासवर्गीयातून प्रथम द्वितीय तृतीय अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे, शालेय शैक्षणिक साहित्य, कपडे, पुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी तर आभार व्ही टी माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.
Post a Comment