नागपूर : अमेझॉनच्या माध्यमातून ऑनलाइन पाकिस्तानी झेंड्याचो विक्री केली जात असल्याच्या निषेधार्थ आज रोजी मंगळवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमेझॉनच्या कार्यालयावर हल्लाबोल केले. यावेळी कार्यकर्ते दार तोडून आत घुसले. अमेझॉन ट्रांसपोर्टेशन सर्विसेस गणेशपेठ कॉलोनी, बैद्यनाथ चौक येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात हाती मिळेल त्या वस्तूची फेकाफेक, खुर्च्या, फर्निचरची तोडफोड करण्यात आल्याने वातावरण तापले. शहर अध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. अमेझॉन कंपनी पाकिस्तानी झंडे ऑनलाइन विकत असल्याच्या विरोधात तसेच हिंदू धर्माविरोधी पुस्तक विकण्याच्या विरोधात हे निषेध आंदोलन होते. स्वतः ऑर्डर करुन याविषयीची खात्री करण्यात आली असेही यावेळी माध्यमांशी बोलताना पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
Post a Comment