महेश भावसार व कुटुंबीयांचा क्रांतिकारी निर्णय !
(चाळीसगाव प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील सायगाव बगळी या गावी प्रथमच महेश भावसार व कुटुंबीयांच्या वतीने सत्यशोधक सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीने " कुलस्वामिनी लेडीज कॉर्नर व जनरल शॉप " या नवीन दुकानाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पाटील यांनी केले तदनंतर सत्यशोधक समाजाच्या प्रार्थनेचे गायन करण्यात आले.देवळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सायगाव चे माजी सरपंच धर्मा खंडू काळे यांच्या हस्ते फीत कापून दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या हस्ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर, शिक्षण क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी मांदुर्णे गावाचे सरपंच दगडू गणपत पाटील, सायगाव चे सरपंच रमेश वामन माळी, जिल्हा परिषद सदस्य जळगाव भूषण काशिनाथ पाटील, उपखेडचे माजी सरपंच महेश मगर, उपसरपंच गोकुळ रामराव रोकडे, उपसरपंच गोरख आत्माराम पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश श्रीपतराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज पुंडलिक पाटील, लोकमतचे पत्रकार गोकुळ मंडळ, राजेंद्र काळे, माजी सरपंच दगडू आत्माराम पाटील, महेंद्र पाटील, पोलीस पाटील - विष्णू पाटील, दगडू पाटील, विकास पाटील, दीपक भावसार, नंदू रोकडे, पिनू बाबा, दिनेश महाजन, किशोर भावसार, मुन्ना भावसार तसेच पंचक्रोशीतील सर्व राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, कृषी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी नवीन दुकानासाठी भावसार कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्यात व त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment