रोहिणी खडसे झाल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा

 


मुंबई : एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या राज्य महिला अध्यक्षपदी  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या विद्या चव्हाण यांच्या जागी अध्यक्षा झाल्या आहेत. रोहिणी खडसे या राजकारणात सक्रीय आहेत. एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. रोहिणी खडसे यांनी गेल्या विधानसभेची निवडणूक ही भाजपाकडून लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर वडिलांच्या पाठोपाठ रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीत गेल्या होत्या. आता रोहिणी खडसे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments