(धरणगांव|प्रतिनिधी) धरणगाव : येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकरराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी क्रांतिकारक भारतीय स्वतांत्र्यवीर खाज्या नाईक ( भिल्ल ) यांच्या समाधीस्थळी मान्यवरांनी अभिवादन केले. तद्नंतर बाभळे बु. गावात एकलव्य संघटना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात भगवान एकलव्य व क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर खाज्याजी नाईक यांच्या प्रतिमेस कृ.उ.बा.समितीच्या सभापती लताबाई पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन पाटील, एकलव्य संघटनेचे कार्याध्यक्ष सुधाकर वाघ आदी मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी कृ.उ.बा.समितीचे उपसभापती तथा एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय जुलाल पवार यांच्याकडून कार्यालयास प्रतिमा भेट करण्यात आली. कार्यक्रमप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, युवा जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे, अपंग सेल जिल्हाध्यक्ष ऋषि सोनवणे, जिल्हा संघटक पिंटू गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष पिंटू गायकवाड, जळगांव तालुकाध्यक्ष राहुल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते रामलाल पवार, पं.स.माजी सभापती अनिल पाटील, शिवसेना विभाग प्रमुख टिकाराम पाटील, भरत मोरे, मकरंद सैंदाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नवनाथ तायडे, उपसचिव मोरेश्र्वर पाटील, निंबा साळुंखे, मिलिंद दाभाडे, आनंदा पवार, राकेश पाटील, उन्मेश साळी, कर्मचारी वृंद व संचालक मंडळ यांसह एकलव्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पवार यांनी तर आभार नवनाथ तायडे यांनी मानले.
Post a Comment