धरणगाव : मुलांच्या शिक्षणाला आई-वडिलांनी प्रोत्साहन द्यावे शिक्षण आधुनिक काळातील सर्वात मोठे यशाचे साधन आहे.असा विचार मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.तेली समाजातर्फे आयोजित गुणगौरव समारंभात मान्यवरानी असे मत व्यक्त केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने, तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी, नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील ,पाचोरा येथील एम एम कॉलेजचे प्राध्यापक डॉ अतुल सूर्यवंशी ,शेंदुर्णी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका हरिभक्त परायण डॉ योगिता चौधरी, कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे तथा तेली समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरी, नितीन चौधरी मंचावर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जयदीप पाटील म्हणाले की, सध्याच्या युगात ज्ञान हे सर्वात मौल्यवान आहे ज्ञानी व्हा संगणक सध्याच्या युगाची बोलीभाषा आहे. आई-वडिलांसह मुलांनी संगणक साक्षर होणे काळाची गरज आहे. शिक्षणासोबत कुटुंबात नीती मूल्यांना महत्त्व द्या असेही ते म्हणाले .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.योगिता चौधरी म्हणाल्या की, प्रत्येक समाज हा आपल्या प्रगतीच्या माध्यमातून देशाची सेवा करत असतो .तिळवण तेली समाजाने आपल्या कर्तुत्वाने आजपर्यंत देशाची सेवा केलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आई-वडिलांचा आणि आजी-आजोबांचा सन्मान केला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.डॉ अतुल सूर्यवंशी म्हणाले की इंग्रजी ही जगाची भाषा आहे विद्यार्थ्यांनी इंग्रजीवर अतोनात प्रेम करावे संघर्ष केल्याशिवाय जीवनात कधीही यश मिळत नाही .धरणगाव या शहराला ऐतिहासिक वारसा आहे धरणगावच्या मातीतून ऐतिहासिक व्यक्तिमत्व घडायला हवी असेही ते म्हणाले.सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी म्हणाले की ,कोणत्याही यशाचा रस्ता हा खडतर असतो परंतु यश हे खूप सुंदर असते यशाला कोणताही शॉर्टकट नसतो.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सुनील चौधरी म्हणाले की,समाज एकोप्याने राहणे यातच समाजाचा विकास असतो आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने समाजाच्या कार्यासाठी हातभार लावला पाहिजे.कार्यक्रम प्रसंगी इयत्ता दहावी इयत्ता बारावी तसेच पदवी व उच्च पदवीधर यशवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह गौरव करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र शालेय कागदपत्रे ठेवण्यासाठी फोल्डर व मिठाईचा डबा देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डि .के चौधरी सर यांनी केले तर आभार दीपक चौधरी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय सैदाणे ,भिका कोंडू चौधरी, शांताराम निंबा चौधरी, संजय वामन चौधरी ,अरविंद चौधरी, गोलू चौधरी, गणेश गुलाब चौधरी, मनीष अनिल चौधरी, परेश चौधरी, गौरव चौधरी, दर्शन चौधरी, अनिल चौधरी,आदी मंडळीने परिश्रम घेतले
Post a Comment