दुर्गेश महाजन याचा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल सत्कार
खेळ खेळल्याने खिलाडूवृत्ती निर्माण होते व शरीर तंदुरुस्त राहते - जे एस पवार [ मुख्याध्यापक ]
(धरणगाव |प्रतिनिधी) धरणगांव : शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय खेळ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडाशिक्षक एच.डी.माळी यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या शुभहस्ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आज राष्ट्रीय खेळ दिनाचे औचित्य साधत आज शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जे.एस.पवार यांच्या शुभहस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी झालेला वर्ग ९ वीचा विद्यार्थी दुर्गेश महाजन यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कबड्डी स्पर्धामध्ये लहान गटात वर्ग ६ वी चा संघ, मोठ्या गटात मुलींचा वर्ग ९ वी चा संघ, मुलांचा १० वी चा संघ विजय झाला होता. यानंतर हॉलीबॉल स्पर्धेत मुलांचा १० वी चा संघ, मुलींचा ९ वी चा संघ विजय झाला होता. तसेच लिंबू चमचा, गोणपाट स्पर्धा, १०० मीटर रनिंग , थाळीफेक, भालाफेक असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये विजयी स्पर्धकांना व संघाना पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी क्रीडाशिक्षक एच.डी.माळी, एस.एन.कोळी, एस.व्ही.आढावे तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच डी माळी तर आभार पी डी पाटील यांनी मानले.
Post a Comment