भडगांव : शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कार्यकर्त्यांसह भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले.तुम्ही कधी ही एकटे समजू नका हा सर्व शिवसेना परिवार तुमचा सोबत आहे.असे सांगत गुलाबराव वाघ यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला.यावेळी भडगांव तालुका प्रमुख अनिल पाटील,धरणगाव ताकुला समन्वयक संतोष सोनवणे,शरद शिरसाट,विलास पवार, गोडगांव येथील पदाधिकारी उपस्थित होते
Post a Comment