धरणगावात श्रावण मासनिमित्त भव्य संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन


(धरणगाव |प्रतिनिधी) धरणगाव : येथील तेलाठी गल्ली परीसरात आजपासून संगीतमय शिव महापुराण कथेला प्रारंभ झाले असून कथेची सांगता दि ३ रविवार रोजी होणार आहे. कथेची वेळ रात्री ८ ते १०.३० या वेळेत होत आहे.
भव्य शिवपुराण कथेचे कथाकार हभप भागवताचार्य मेघनाद महाराज ठाकरे धरणगावकर यांसह गायनाचार्य हभप शंभू महाराज चव्हाण, दयाराम महाराज, तबलावादक प्रकाश महाराज अहिरे, ऑर्गन वादक कैलास महाराज, तसेच वेशभूषाकार हभप सुधीर महाराज व यश ठाकरे यांचा सहभाग असणार आहे. सदरील कथेसाठी पंचक्रोशीतील जास्तीत जास्त शिवभक्त व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक श्रीशक्ती नारीशक्ती महिला मंडळ व शिवभक्तांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments