धरणगाव शासकीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा चौथा खेळ बुद्धीबळाचा


"बुध्दीबळ स्पर्धा " महात्मा फुले हायस्कूल येथे उत्साहात संपन्न 


(धरणगांव |प्रतिनिधी) धरणगांव :  जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे धरणगाव तालुकास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धा धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूल येथे घेण्यात आल्या स्पर्धेचे उद्घाटन  विद्यालया चे मुख्या. जे एस पवार यांच्या शुभहस्ते बुध्दीबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. स्पर्धेच्या नियमां विषयी माहिती क्रीडा शिक्षक एम डी परदेशी व तालुका समन्वयक सचिन सूर्यवंशी यांनी दिली या स्पर्धेत पंच म्हणून डी एन पाटील, राकेश धनगर, पवन बारी, गावीत सर, वाय ए पाटील, जितेंद्र ओस्तवाल यांनी काम पाहिले. संपूर्ण स्पर्धा तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या या स्पर्धेत  १४,१७ व १९ वर्ष वयोगटातील मुला मुलींनी सहभाग नोंदविला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीडा शिक्षक हेमंत माळी यांनी केले स्पर्धेसाठी आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांनी आसन पट्टी उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचे व कार्यक्रमाचे आभार  डी एन पाटील सर यांनी मानले. स्पर्धा पार पडण्यासाठी तालुक्यातील क्रीडा शिक्षक यांनी परिश्रम घेतले तसेच जीवन भोई , अशोक पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले .

0/Post a Comment/Comments