खासदारकी बहाल झाल्यावर राहुल गांधी वायनाडला


 तिरुवनंतपूरम : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी बहाल झाल्यावर त्यांनी आपला मतदारसंघ वायनाडला जाण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी ते वायनाडला रवाना झाले. तेथे ते सायंकाळी जाहीरसभेला संबोधित करणार असल्याची माहिती आहे. राहुल आज वायनाडमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. खासदारकी बहाल झाल्यानंतर राहुल यांचा हा पहिलाच वायनाड दौरा असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिली. वायनाडच्या लोकांना लोकशाहीचा विजय झाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. त्यांचा आवाज संसदेत परतला आहे. राहुल हे केवळ त्यांचे खासदार नाहीत तर कुटुंबातील सदस्य आहेत, असेही वेणुगोपाल म्हणाले.

0/Post a Comment/Comments