स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साळवे इंग्रजी विद्यासलयात विविध स्पर्धा व ध्वजारोहण संपन्न


धरणगाव तालुक्यातील साळवे येथील ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष  डॉ. गिरीश नारखेडे खजिनदार डॉ. चंद्रकांत नारखेडे शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. शशिकांत नारखेडे व कार्यकारी मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्यावर उत्कृष्ट भाषणे केली आणि  देशभक्तीपर गीत गायन सादर केले. विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली. व्ही एस कायंदे यांनी बँड पथक,निता मॅडम व प्रतिभा मॅडम यांनी स्काऊट गाईड पथक, गुणवंती मॅडम व कविता मँडम यांनी गीत गायन स्पर्धा यांची जबाबदारी स्वीकारली,तायडे सर चित्रकला स्पर्धा, मुख्याध्यापक ए एस पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून दिले. 

त्यानंतर प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांसमवेत विविध कार्यकारी सोसायटीमध्ये चेअरमन श्री निवृत्ती बराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंतर ग्रामपंचायतीतर्फे झेंडा चौकात शासकीय ध्वजारोहण प्रथम नागरिक सरपंच सौ आशाताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी नववी ब ची विद्यार्थिनी जागृती निलेश डाकेने स्वातंत्र्याबद्दल उत्कृष्ट भाषण सादर केले.भावना कोळी व पायल सुर्यवंशी यांनी देशभक्तीपर सुंदर गीत सादर केले.सर्व ग्रामस्थांनी, विविध संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी,पोलीस पाटील निसार पटेल व ग्राम विस्तार अधिकारी, सगळ्यांनी कौतुक केले.अशा पद्धतीने  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण बोरोले यांनी केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख एस डी मोरे व रंजना मँडम यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले.यावेळी गावातील नागरिकांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments