काँग्रेसचा विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावरही दावा


मुंबई : राष्ट्रवादीतील NCP फुटीमुळे काँग्रेसने विधान परिषदेतील विरोध पक्षनेते पद पटकावले.आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही मिळविण्याचे प्रयत्न काँग्रेसच्या गोटातून सुरु झाले आहेत.संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेते पद पदरात पाडून घेण्यासाठी पक्षातील आमदारांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र देखील लिहिले.काँग्रेसच्या या मागणीनंतर महाविकास आघाडीत पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर सभागृहातल्या संख्याबळाचे आकडे बदलले आहे. विरोधी बाकांवर ज्या पक्षाचे संख्याबळ सर्वाधिक, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो.त्यामुळे विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली.विधान परिषदेतही काँग्रेसचे संख्याबळ अधिक आहे.संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेते पद पदरात पाडून घेण्यासाठी आमदारांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र देखील लिहिले आहे. पत्रावर विधानपरिषदेच्या 9 पैकी 6 आमदारांच्या सह्या आहेत. यात अभिजित वंजारी, प्रज्ञा सातव, वजाहत मिर्झा, राजेश राठोड, धीरज लींगडे, सुधाकर अबाले यांच्या सह्या आहेत. या पदासाठी काँग्रेसमध्ये सतेज पाटील, राजेश राठोड आणि अभिजीत वंजारी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. विधानपरिषदेत सध्या काँग्रेस पक्षाचे 9, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे 5, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 8, शिवसेना शिंदे गटाचे 3 जण आहेत. सध्या विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते पद ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्याकडे आहे.

0/Post a Comment/Comments