(धरणगाव|प्रतिनिधी) धरणगाव : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून काल झालेल्या १४ वर्ष आतील गटातील कबड्डी खेळात तालुकास्तरावर विजयी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.सर्वप्रथम हॉकीचे जादूगार, महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षिका पुष्पलता भदाणे यांनी मेजर ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील महान योगदान व राष्ट्रीय क्रीडा दिनाची सखोल माहिती सांगितली. आजच्या दिनाचा दुग्धशर्करा योग म्हणजे सध्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. काल जीपीएस स्कुल पाळधी येथे १४ वर्ष आतील वयोगटातील कबड्डीचे सामने संपन्न झाले. यामध्ये गुड शेपर्ड स्कुलच्या अंडर १४ मुलांच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरावर मजल मारली. प्रथम बोरगाव दुसऱ्या सामन्यात चांदसर आणि अंतिम सामन्यात बालकवी ठोंबरे विद्यालयाचा पराभव करून या संघाने तालुकास्तरावर विजय मिळवला. यात कर्णधार मेहुल कोठारी, भावेश पवार, मनिष पाटील, आयुष जनजवार, क्रिष्णा पवार, अनिकेत माळी, उमान पटेल, दक्ष महाजन, शुभम पाटील, कुणाल पाटील, कुणाल मनुरे, जुएब शेख या सर्व विजयी खेळाडूंचे प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सर्व शिक्षकवर्ग आणि मॅनेजमेंट यांनी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. विजयी संघाला क्रीडा मार्गदर्शक दिपक बयस यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पलता भदाणे यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, विद्यार्थी - विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
Post a Comment