किरीट सोमय्या कपडे घालून पुन्हा मैदानात! उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा



मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांची तोप पुन्हा  एकदा धडाडली असून त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला. मुंबई महापालिकेत 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळा झाला असून यात ठाकरे गटाच्या नेत्याशी संबंधित एका कंपनीला कोविड हॉस्पिटल उभारण्याच्या नावाखाली 100 कोटींचे बेकायदा  कंत्राट देण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या संगनमताने हा गैरव्यवहार करण्यात आल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. ठाकरे गटावर आरोप करण्यासाठी सोमय्या यांनी व्हिडिओ जारी केले आहेत. सोमय्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याशी संबंधित ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रायवेट लिमिटेड या कंपनीला महानगरपालिकेने मुलुंड रिचर्डसन क्रूडास मैदानावर तात्पुरते कोव्हीड हॉस्पिटल उभारण्याच्या नावावर 100 कोटी रुपयांचे गिफ्ट दिले. ज्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले, ती ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. या कंपनीने 2019 पर्यंत काही संगीताचे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याच कंपनीला मुलुंड व दहिसर येथील कोविड हॉस्पिटल बांधणे आणि भाड्याने देण्याचा प्रकार मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या संगनमताने करण्यात आल्याचे सोमय्या म्हणाले. सिडकोने ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला 1850 खाटांचे हॉस्पिटल बांधण्याची ऑर्डर दिली. त्यासाठी रु.10 कोटी 94 लाखांचे पेमेंटही करण्यात आले. सुमारे 25 महिने हे हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले व त्यासाठी ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला महिन्याला 3 कोटी 59 लाख 78 हजार रुपये भाडे म्हणजे सुमारे 90 कोटी रुपये देण्यात आले तसेच बांधण्यासाठी अधिकचे 10 कोटी देण्यात आले. या संदर्भात मुंबई पोलिस, आयकर विभाग, प्रवर्तन निदेशालय (ईडी), कंपनी मंत्रालय यांच्याकडे तक्रारही केल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments