१४ वर्ष वयोगटात लिटल ब्लाझम स्कूल संघ, १७ वर्ष वयोगटात सा.दा.कुडे विद्यालय संघ विजयी
(धरणगाव|प्रतिनिधी) धरणगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित तालुकास्तरीय शालेय शासकीय कॅरम स्पर्धो धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूल येथे दि. १८ ऑगष्ट, २०२३ शुक्रवार रोजी घेण्यात आल्या या स्पर्धेचे उद्घाटन धरणगाव अर्बन बँक व नंदिनी कन्स्ट्रक्शनचे संचालक नितीनभाऊ चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले या स्पर्धेत धरणगाव येथील लिटल ब्लाझम स्कूलच्या संघाने १४ वर्ष वयोगटात तर १७ वर्ष वयोगटात सा.दा.कुडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून त्यांची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या विजयी संघांना पी.आर.हायस्कूल चे क्रीडा शिक्षक एम.डी.परदेशी, तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी ,ACS काॅलेज चे क्रीडा संचालक जितेंद्र ओस्तवाल, पवन बारी, प्रविण भोई यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक हेमंत माळी सरांनी केले व आभार सचिन सूर्यवंशी यांनी मानले स्पर्धा पार पडण्यासाठी जीवन भोई यांनी सहकार्य केले.
Post a Comment