खान्देशात प्रथमच महाकावड यात्रेचे धरणगावात आगमन व गाव भंडाराचे आयोजन


(धरणगाव|प्रतिनिधी) धरणगाव : शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात २१ सोमवार, रोजी प्रथमच राज राजेश्वर सार्जेश्‍वर महादेव मंदिर, भोले सरकार मित्र परिवारातर्फे भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले असुन या महाकावड यात्रेत शहर व जिल्ह्यातील असंख्य भाविक सहभागी असणार आहे. पायी निघत असलेल्या कावड यात्रेदरम्यान सूर्य कन्या तापी मातेचे पूजन, सार्जेश्वर महादेव प्रती स्वरूप मुखोटा अभिषेक व पूजन, कलश व कावड पूजननंतर तापी नदी येथून तीर्थ आणत आज सकाळी पावन पालखी कावड यात्रेसह गावात प्रवेश करेल आणि तेथून नंतर पालखी व कावड यात्रा संपूर्ण शहरात फिरून राज राजेश्वर - सार्जेश्‍वर महादेव मंदिरात महारुद्र अभिषेक करण्यात येईल. तद्नंतर भंडारा म्हणून प्रत्येक भाविकांनी महाप्रसाद घ्यावा असे आवाहन यजमान राहुल रमेश वाघ यांनी केले आहे. शहरालगत नैसर्गिक वातावरणात असलेले प्राचीन सारजेश्र्वर महादेव मंदिर हे जागृत देवता म्हणून पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी मोठी गर्दी होते. मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे सारजेश्वर महादेव मंदिराच्या समोरच भवानी मातेचे जागृत मंदिर आहे.

0/Post a Comment/Comments