नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी गुन्हे दाखल


मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केलाय. ईसीएल फायनान्स या कंपनीच्या एडलवाईज ग्रुपच्या पाच पदाधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला असून कर्जाच्या परतफेडीसाठी सातत्याने तगादा लावून मानसिक त्रास दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. खालापूर पोलिसांनी कलम 306 आणि 34 अंतर्गत नोंद घेण्यात आली असून त्यात एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, देसाई यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी आत्महत्या केली होती. त्यामुळे बॉलीवूडमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. कर्जाचा बोझा आणि आर्थिक संकटामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. यासंदर्भात पोलिसांकडून त्यांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडीओंची तपासणी सुरु आहे. त्यात देसाई यांनी बऱ्याच जणांवर आरोप केले असल्याची माहिती आहे

0/Post a Comment/Comments