ठाकरे गटाच्या खासदारांना बसणार फटका


नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावाचा सरकारवर कोणताही परिणाम झाला नसला तरी या घडामोडींचा फटका शिवसेनेच्या ठाकरे गटाला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिंदे गटाने खासदारांना व्हीप बजावला असताना ठाकरे गटाच्या खासदारांनी व्हीपचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाईचे संकेत शिंदे गटाकडून देण्यात आले आहेत.शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिली आहे.शेवाळे यांनी सांगितले की, विरोधकांनी अविश्वास ठराव मांडल्यानंतर आम्ही शिवसेनेच्या खासदारांना व्हीप बजावला होता. त्यात मतदानावेळी केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्याची सूचना करण्यात आली होती. पण ठाकरे गटाचे पाच खासदार मतदानाला अनुपस्थित राहिले. आता त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणी सोमवारी वकिलांशी चर्चा करुन संबंधित सदस्यांना नोटीस बजावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले

0/Post a Comment/Comments