रायपूरमध्ये एससी, एसटी तरूणांचा सरकार विरोधात पूर्ण नग्न होत आक्रोश
रायपूर : १८ जुलै पासून छत्तीसगड विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले असून अधिवेशनाच्या पार्शवभूमीवर राजधानी रायपूरमध्ये मंगळवारी एसटी आणि एससी प्रवर्गातील तरुणांनी पूर्ण नग्न होत आंदोलन केल्याने खळबळ उडाली आहे. तरुण आंदोलन करत विधानसभा परिसरात पोहोचले. यावेळी एससी, एसटी तरुणांनी सर्व कपडे काढले होते.बनावट जात प्रमाणपत्र बनवून ज्या लोकांनी सरकारी नोकरी मिळवली त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या तरुणांनी केली. मंत्र्यांचा ताफा रस्त्याने जात असताना तरुणांनी हे आंदोलन केले. त्यावेळी तरुणांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलन करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.माजी मुख्यमंत्री डॉक्टर रमन सिंह यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना ही काँग्रेस सरकारची नामुष्की असल्याचं म्हटलंय. छत्तीसगढमध्ये बनावट जात प्रमाणपत्रावर नोकरी मिळवल्याच्या प्रकरणाने वातावरण तापलं आहे. नवे राज्य निर्माण झाल्यानंतर अनेक सरकारी विभागांमध्ये सातत्याने तक्रारी दाखल होत होत्या. अनेक बिगर आरक्षित वर्गातील लोकांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्या मिळवल्या आहेत.सरकारने या प्रकरणी उच्चस्तरीय जात पडताळणी समिती स्थापन केली आहे. त्याच्या रिपोर्टच्या आधारे सामान्य प्रशासन विभागाने बनावट जात प्रमाण पत्राच्या आधारे नोकरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या आदेशानंतर अनेक लोक न्यायालयात पोहोचले आहेत. यात काही रिटायरसुद्धा झाले. अद्याप सरकारी आदेशाचे पालन झालेले नाही. त्यामुळे अनेक अधिकारी असे आहेत जे आजही नोकरीवर आहेत.
Post a Comment