लोककलावंतांचे साहित्य संमेलन घेणार ; सुधीर मुनगंटीवार


मुंबई : राज्यात लोककला जिवंत रहावी, लोककलावंतांचा सन्मान व्हावा आणि ही कला सादर करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे; लोककला व तत्सम साहित्य सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी लोक कलावंतांचे साहित्य संमेलन घेण्यास शासन पुढाकार घेईल,असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलन करणाऱ्या लोककलावंतांच्या शिष्टमंडळाला सांगितले.लोककलावंतांच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर आलेल्या मोर्चेकरी बांधवांशी सविस्तर चर्चा करुन मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी त्यांचे समाधान केले. लोककलावंत सांस्कृतिक मंचचे संस्थापक अध्यक्ष विष्णू शिंदे यांच्या नेतृत्वात आलेल्या शिष्टमंडळाशी मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातील विविध कलांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग वेगाने काम करीत आहे; वृद्ध कलावंतांना मानधन वाढ करण्यासंदर्भात काही निकष ठरवावे लागणार आहेत. राज्यातील लोक कलावंतांची यादी तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शिवनेरी, शिवशाही बसमध्ये लोककलावंतांना आरक्षण देण्याच्या तसेच इतर मागण्यांबाबत बैठक घेवून योग्य निर्णय घेण्यात येतील, असे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments