राज्यातील अपघात थांबेना! आठ गर्भवती महिलांनाघेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात,थोडक्यात अनर्थ टळला

 


नांदेड : राज्यात गेल्या काही दिवसापासून अपघातांची मालिकाच सुरू आहे.काही दिवसापुर्वी बुलडाणा येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दुसरीकडे मुंबई-आग्रा महामार्गावर  भरधाव वेगात असलेला कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो थेट हॉटेलमध्ये  घुसून दुर्घटना घडली.आता नांदेड येथे अपघाताची  घटना समोर आली असून मुखेड - बाऱ्हाळी मार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात झाला आहे. यामध्ये काही महिला जखमी झाल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील आठ गर्भवती महिलांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा हा अपघात झाला आहे. मुखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणले होते. त्यानंतर त्यांना शासकीय रुग्णवाहिकेने सोनोग्राफीसाठी मुखेड शहरातील आराध्या सोनोग्राफी सेंटर येथे नेण्यात आले. सोनोग्राफी केल्यानंतर परत येताना त्या रुग्णवाहिकेनेची आणि नगरपरिषदेच्या घंटागाडी वाहनाची समोरासमोर धडक झाली. अपघात होताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी लगेच रुग्णावाहिकेतील जखमी महिलांना रुग्णालात दाखल केले.अपघातानंतर रुग्णवाहिकेत असलेल्या शकुंतला ज्ञानेश्वर राजुरे (वय २२ कोळनूर), अश्विनी अनिल शिंदे (वय २० हसनाळ), निकिता दत्तात्रय शिंदे (वय २४ हसणाळ), संगीता शिवराज टंकम्पले (वय २५ हसणाळ), अनुसया श्रीनिवास बोईनवाड (वय २४ कोळनुर), संध्याराणी चंद्रकांत थोटवे (वय २० हसनाळ), रोशनी रत्नदीप कांबळे (वय २२ कोळनुर), राजश्री खुशाल इंगोले (वय २० हसनाळ) इत्यादी गर्भवती महिला जखमी झाल्या. जखमी महिलांना तात्काळ मुखेडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान देखील झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे

0/Post a Comment/Comments