महात्मा फुले हायस्कूल येथे पालक - शिक्षक सभा संपन्न




(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पालक - शिक्षक सभा व माता - पालक शिक्षक सहविचार सभा घेण्यात आली. सर्वप्रथम शैक्षणिक वर्ष २०२३ - २४ साठी पालक शिक्षक व माता पालक - शिक्षक संघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली.पालक शिक्षक सभेच्या अध्यक्षपदी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार, उपाध्यक्षपदी सुलोचना रवी करोसिया व सचिवपदी पालक शिक्षक संघाचे प्रमुख पी डी पाटील व प्रत्येक वर्गातील एक पालक असे १२ सभासदांची सर्वाणुमते निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.पालक शिक्षक संघाचे उपविभाग प्रमुख एच.डी. माळी यांनी पालक शिक्षक संघाची उद्दिष्टे, शालेय शिस्त या संदर्भात मार्गदर्शन केले. पी डी पाटील यांनी शाळेच्या संदर्भात पालकांना विस्तृत अशी माहिती, शिष्यवृत्ती, क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा विषयी विस्तृत माहिती सांगितली.कार्यक्रमाचे अध्यक्षा जेष्ठ शिक्षीका एम.के.कापडणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षक व पालक या दोघांचा वाटा आहे. आपण दोघं मिळून चांगला विद्यार्थी घडवूया यातून आपले पालकांचे व शाळेचे नाव मोठे होईल. असे प्रतिपादन केले.पालक शिक्षक सभेला रितेश साने, उषा कुंभार, पुरुषोत्तम जाधव, उरमल मोरे, निर्मला पवार, सुलोचना करोसिया, सुरेखा करोसिया, राकेश महाजन, मनीषा बारेला, नितीन चंडाले, अजय पचेरवाल, बापु भिल, अनिल भोई शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. या सहविचार सभेचे सूत्रसंचालन व आभार पी.डी.पाटील यांनी मानले.

0/Post a Comment/Comments