एमआयडीसी भूखंड प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने चौधरी यांना अटक केली होती व मागील अनेक वर्षांपासून ते कारागृहातच होते. पुण्यातील भोसरी एमआयडीसीत 3.1 एकर जमीन खरेदीत एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यापूर्वी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार असल्याचं बोलले जात होते. 2016 मधील हे प्रकरण आहे, 31 कोटी रुपयांचा 3.1 एकर जमीनाचा हा भूखंड एकनाथ खडसे यांचे जावई आणि पत्नी यांनी 3.7 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता.खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर करुन कमी किंमतीत ही जागा खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी चौकशीसाठी झोटिंग समिती नेमण्यात आली होती.
Post a Comment