(धरणगाव प्रतिनिधी) : धरणगाव येथील राहुल मनोज राहूजने सी.ए परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्याबद्दल धरणगाव येथील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा तसेच डॉ.अतुल सूर्यवंशी लिखित शोभा डे यांचा ग्रंथ देखील यावेळी भेट देऊन सत्कार करण्यात आला.अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुठलाही क्लास न लावता स्वतःच्या मेहनतीने सी.एची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल राहुलचे सर्वत्र कौतुक होत आहे .यावेळी पाचोरा येथील प्राध्यापक डॉ. अतुल सूर्यवंशी, कर्तव्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी, तसेच श्याम भाटिया, भूषण मेहर, प्रेमचंद मेहर, आनंद ज्ञानसागर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील चौधरी यांनी केले तर आभार शाम भाटिया यांनी मानले.राहुलने यावेळी बोलतांना सागितले की सी.ए व्हायची प्रेरणा हि मला माझ्या आईकडून मिळाली कारण आईचंही स्वप्न हे सी.ए व्हायचं होतं. ते स्वप्न आईने माझ्या अंगी बघितले आणि आज मी ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केलं आहे. मनात जिद्द आणि महेनत करून सर्व काही मिळवता येत प्रत्येक विद्यार्थ्याने यश प्राप्त करून आपल्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल केलं पाहिजे असे मत यावेळी राहुलने व्यक्त केले
Post a Comment