म्हणून आला 'तो' सरकारी मेसेज !




(सर्कल टीम) : विविध प्रकारच्या जाहिरातींचे लघुसंदेश मोबाईल फोनवर येत असतात. मात्र आज सकाळी 10.20 ते 10.30 दरम्यान आज असंख्य स्मार्टफोन ‘व्हायब्रेट' होऊन त्यावर एक संदेश दिसला. त्यामुळे एकाएकी असे का झाले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याबाबत अनेकांनी समाजमाध्यमांत पोस्ट करून प्रश्न विचारले आहेत. मात्र केंद्रीय तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही तातडीची चाचणी केली जात असल्याची चर्चा आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना जागरूक करणे शक्य आहे. त्यामुळे सरकारकडून अनेकदा नैसर्गिक आपत्तीविषयी लघुसंदेश पाठवून सूचना दिली जाते. मात्र सर्व नागरिक ते संदेश गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे एकाचवेळी अनेकांना असे इमर्जन्सी अलर्ट पाठवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.या अनुषंगाने शोध घेतला असता, काही महिन्यांपूर्वी 23 एप्रिल रोजी युनायटेड किंग्डमनेही अशा प्रकारे इमर्जन्सी अलर्टची चाचणी घेतल्याचे निदर्शनास आले होते.या प्रकारा मुळे अनेकांचा मनात काही काळ भीती निर्माण झाली होती.खरे कारण समजल्यावर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला 

0/Post a Comment/Comments