गुजरातमध्ये गेल्या 3-4 दिवसापासू मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्यात पावसानं थैमान घातलं असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. पावसाचं रौद्ररूप दाखवणारी एक बातमी आता समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे जुनागढ जिल्ह्यात दोन मजली इमारत कोसळली असून अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.गुजरातमध्ये पावसाने कहर केला आहे. रविवारी सकाळपर्यंत जुनागड जिल्ह्यात 241 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.सर्वत्र जलमय झालं असताना जुनागडमध सोमवारी दुपारी येथे एक दुमजली इमारत अचानक कोसळली. ही घटना घडली तेव्हा इमारतीत अनेक लोक उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. सध्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी एक टीम घटनास्थळी हजर आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.गुजरातमध्ये पावसाने अक्षरक्षः हाहाकार माजवला आहे. गेल्या 3- 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. धरणे आणि नद्यांमधील पाण्याची पातळी धोकादायक पातळीपर्यंत वाढल्याने पावसाने गावे एकाकी पडली. राज्यातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय झाली. नवसारी आणि जुनागडमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने निवासी भाग आणि बाजारपेठांमध्ये पाणी साचले आहे.
Post a Comment