नाशिक : नाशिक रोड येथे आनंद नगरमधील गुलमोहर कॉलनीत रविवारी रात्री भरवस्तीत बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. वनविभागाचे पथक बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहे. दुसरीकडे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रशासनाने रात्रीच्या वेळी या परिसरातील नागरिकांनी बाहेर निघू नये असे आवाहन केले आहे.रात्री आठच्या सुमारास आनंदनगर गुलमोहर कॉलनी येथे बिबट्या दिसला. भरवस्तीत बिबट्या फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियावर निवासी भागातील रस्त्यावर बिबट्या फिरत असल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले. वनविभागाचे पथक बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. गुलमोहर कॉलनीतील डॉक्टर कनौजीया यांच्या बंगल्यात बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तसंच कदम लॉन्ससमोरील परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी अवघ्या काही फुटांवर बिबट्या समोर उभा ठाकल्याने पादचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.बिबट्याने कदम लॉन्सजवळ एका पादचाऱ्यावरही हल्ला केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. जखमी पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Post a Comment