पंकजा मुंडे नाराज नाही, त्यांच्याशी वरीष्ठ चर्चा करणार ; फडणवीस






मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस असून त्या मुळीच नाराज नाहीत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्या सातत्याने पक्षाचे काम करत असून, यापुढेही त्या करत राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.आपण सध्याच्या राजकारणाला कंटाळून दोन महिने राजकारणापासून अलिप्त राहणार असल्याचा निर्णय घेतल्याचे पंकजा यांनी शुक्रवारी जाहीर केले. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे यांच्याशी आमचे राष्ट्रीय नेते चर्चा करतील. त्यांच्या मनात काय आहे, हे समजून घेणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत आला आहे. आमचे बरेच जण त्यांच्याविरोधात निवढणूक लढवत होते. त्यामुळे काही जणांची नाराजी स्वाभाविक आहे. प्रत्येकाला हे लगेच मान्य होईल, असे नाही. मात्र, प्रत्येक गोष्टीचा मार्ग चर्चेतून निघत असतो, असेही ते म्हणाले. पंकजा मुंडे या दोन महिने सुटी घेणार आहेत असे समजले, त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत, त्यांच्याशी राष्ट्रीय नेते चर्चा करतील. आम्ही त्यांच्या मनात काय ओह हे समजून घेणार आहोत.असे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  माध्येमांशी बोलतांना सांगितले 

0/Post a Comment/Comments