मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या समवेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित होते. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, हे अद्याप समोर आलेले नाही. राज्यातील काही प्रश्रांवर चर्चा करण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याचे बोलले जात आहे. पण या भेटीचे अनेक राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत. अलिकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या समीकरणांवर चर्चा सुरु झालीय. राज ठाकरे व उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार की काय, अशीही चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. मात्र, या भेटीमागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका हे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे
Post a Comment