धारूर : धारूर तालुक्यातील हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये खिचडी शिजवणारी महिला आणि एका शिक्षिकेमध्ये वाद झाला.दोघींनी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यासमोरच अक्षरशः एकमेकीचे केस ओढत मारहाण केली. खिचडी शिजवणाऱ्या महिलेने पतीसह शाळेत येऊन शिक्षिकेबरोबर झटापट केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना पुरेसा दर्जेदार अन्न देण्याची मागणी करणाऱ्या शिक्षिकेसोबत महिलेने हुज्जत घातली. परंतु या प्रकारास शाळेच्या मुख्याध्यापक शिला बोळे या जबाबदार असल्याचे गावातील नागरिकांकडून सांगितले जात आहे.तालुक्यातील जोड हिंगणी येथे असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथी वर्गामध्ये जवळपास 60 विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना पुरेशी खिचडी न देणे, दोन बिस्किटावर विद्यार्थीची बोळवण करणे, यासह दर्जेदार पोषण आहार न देता ओबडधोबड प्रमाणात विद्यार्थ्यांच्या ताटात खिचडी टाकणे, हा प्रकार सातत्याने होत असतो. याबाबत शाळेतील कोरडे शिक्षिकेने विद्यार्थ्यांना पुरेसा पोषण आहार देण्याची मागणी महिलेकडे केली होती. तसेच महिलेचा पती शाळेच्या आवारात लघुशंका करत असल्याबाबत या महिलेने आपल्या पतीला समज द्यावी, असेही सांगितले होते. यावरून महिलेने पतीसह शाळेत येऊन शिक्षिकेसोबत हुजत घालत मारहाण केली.घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Post a Comment