नागपूर : शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या करून मुलासह रेल्वेने जात असलेल्या आरोपी बापलेकास लोहमार्ग पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकावर पकडले. सुरेश गहरे (55) आणि शुभम सुरेश गहरे (25 रा. आकोट) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर ज्ञानेश्वर गहरे (वय 52) असे मृताचे नाव आहे. दोन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी कोतवाली पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.अकोट तालुक्यातील ग्राम देऊळगाव येथे आली. गहरे कुटुंबाची शेती आहे. सुरेश आणि ज्ञानेश्वर दोघेही सख्खे भाऊ असून, त्यांच्यात या शेतीवरून वाद सुरू होता. या वादातून सुरेश व शुभम या बापलेकाने ज्ञानेश्वर यांना शेतात फवारणी करत असताना लोखंडी पाईप व कुन्हाडीने मारून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले आणि फरार झाले. ज्ञानेश्वर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताची पत्नी अर्चना गहरे यांच्या तक्रारीवरून आकोट ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला.दरम्यान, घटनेनंतर आरोपींनी पळ काढला. दोघेही बाप लेक 18029 शालीमार एक्स्प्रेसने पळून जात असल्याची गुप्त माहिती आकोट पोलिसांना मिळाली. त्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि आरोपी बाप लेकांचे छायाचित्र व्हॉट्सअॅपवर दिले. त्यांच्याकडून पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना छायाचित्र मिळताच आरोपींचा शोध सुरू झाला. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास शालीमार एक्स्प्रेस नागपुरात पोलिसांनी प्रत्येक डब्याची झाडाझडती घेतली. मात्र, ते तेथे नव्हते.फलाटावर उतरुन नळावर पाणी पित असताना पोलिसांना ते दिसले. ओळख पटवून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीनंतर कोतवाली पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सरवदे, उपनिरीक्षक ओमप्रकाश भलावी, पोलिस हवालदार संजय पटले, पप्पु मिश्रा, बुरडे, हिंगणे, त्रिवेदी आणि प्रवीण खवसे यांनी केली.
Post a Comment