संभाजीनगर : आतापर्यंत आपण अनेक चोरीच्या घटना बघितल्या असेल ज्यामध्ये चोर घरातून मौल्यवान वस्तू चोरून नेतो. मात्र, संभाजी नगरमध्ये चोरीचा एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत चोराने घरातून चक्क महिलांचे अंतवस्त्र चोरल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, त्याच्या चोरी करण्याचं कारण ऐकून पोलिसंही चक्रावून गेले. विशेष म्हणजे या विकृत चोराचे हे जगावेगळे कारनामे सीसीटीव्ही फुटजेमध्येही कैद झाले आहे. सचिन सारंग दिंडोरो (वय, 19) असं त्याच नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी नगरच्या वाळूज परिसरात गेल्या काही दिवसापासून चोरीचा एक विचित्र प्रकार घडत होता. परिसरातील घरातून महिलांची अंतर्वस्त्र चोरीला जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. महिलांनी घराच्या आवारत, बालकनीत वाळत घातलेली अंतर्वस्त्र चोरीला जाण्याचे प्रकार वाढले. एकापाठोपाठ अनेक महिलांच्या घरी चोरी होऊ लागली. घडत असलेला हा प्रकार महिलांनी घरातील पुरुषांना सांगितल्यावर नागरिकांनी पोलिसांत न जाता सिसिटिव्हीच्या माध्यमातून चोराला पकडलं. काही ठिकाणी हा चोर अंतर्वस्त्र चोरी करताना आढळला. तो केवळ अंतर्वस्त्रे चोरल्यानंतर एखाद्या घरात डोकवून अश्लिल चाळे देखील करत असल्याच निदर्शनास आलं. नागरिक त्याच्यावर पाळत ठेवूनच होते अशातच शनिवारी दुपारच्या सुमारास त्याला वृंदावन सोसायटीसमोरुन नागरिकांनी ताब्यात घेतलं.नागरिकांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला चांगलाच चोप दिला आणि वाळूज पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच दामिनी पथकाने घटनास्थळी धाव घेत त्या चोराला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्याने जे सांगितलं त्याने पोलीसही चक्रावून गेले. आईवडिल लग्न लावून देत नसल्याने आपण असं कृत्य करत असल्याच त्याने पोलिसांना सांगितलं.महिलांचे अतंर्वस्त्र चोरणं म्हणजे सेक्स्युअल डिस्फंक्शनचा प्रकार असल्याच समोर आलं आहे. लाखात एखाद्याला अशी सवय जडते. अशा विकृत लोकांना महिलांसंबधीत वस्तू चोरण्यात आंनद मिळतो. किंवा त्या वस्तूचा गंध घेण्यात आंनद मिळतो. यावर योग्य उपचार केल्यास हे प्रकार कमी होऊ शकतात. थेरपी आणि समुपदेशन केल्यास मदत मिळते असं मानसोपचार तज्ञ सांगतात.
Post a Comment