रोहन गजरे यासं समाज कल्याण विभाग जळगाव च्या वतीने ५,००० रुपयाचा धनादेशाचे वितरण !
राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांचे जीवन कार्य प्रेरणादायी ; किशोर माळी.
(धरणगाव प्रतिनिधी) धरणगांव : शहरातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे २६ जून छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मोत्सवनिमित्त सामाजिक न्याय दिन पर्वाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. डी.पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण विभाग जळगाव येथील तालुका समन्वयक किशोर माळी उपस्थित होते. मा.योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. मान्यवरांचे हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या वतीने प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतुन ९१ % मिळवुन प्रथम आलेला चि.रोहन सुनिल गजरे यास छत्रपती शाहू महाराज पुरस्कार [ ५ हजार रुपयाचा धनादेश ] मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला.समाज कल्याण विभागाचे तालुका समन्वयक किशोर माळी यांनी प्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा प्रतिमेला अभिवादन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, भारत सरकार स्कॉलरशिप, गटई कामगारांसाठी पत्राचे स्टॉल योजना, सबलीकरण व स्वाभिमान योजना व इतर योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देऊन विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी विद्यार्थ्यांना विविध शाळेतील शिष्यवृत्ती च्या बाबतीत अवगत केले. चांगला अभ्यास करा आणि शिष्यवृत्ती मिळवा आपल्या शाळेचे, पालकांचे नाव उज्वल करा असे प्रतिपादन केले. याप्रसंगी वंदना गजरे, रोहन गजरे तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र कांबळे [ कार्यालयीन अधिक्षक ] सर्व कार्यालयीन कर्मचारी व सर्व तालुका समन्वयक यांचे सहकार्य मिळाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार एच डी माळी यांनी मानले.
Post a Comment