मुंबई : 17 व 18 जुलैला बंगळुरुमध्ये राष्ट्रभक्त पार्टीची बैठक आहे, ही विरोधी पक्षांची बैठक नाही ही काय स्पर्धा नाही. आम्ही आमचे काम करत आहोत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि मी स्वतः या बैठकीला जाणार आहे पटण्यानंतर आता बंगळुरूमध्ये बैठक होणार आहे. 18 प्रमुख पक्षांनी त्यावेळी उपस्थिती लावली होती. जे प्रमुख देशभक्त पक्ष आहेत, जे लोकशाही टिकवण्यासाठी हुकूमशाही विरोधा मध्ये एकत्र येणार आहेत. 22 ते 23 पक्ष एकत्र येतील आणि लोकसभा आणि देशाच्या प्रश्नावर चर्चा होईल शरद पवार सुद्धा या बैठकीला असणार आहेत. 17 तारखेला सोनिया गांधी यांनी डिनरचे आयोजन केले आहे. संध्याकाळी आणि सकाळी अशी दोन टप्यामध्ये ही बैठक होणार आहे नोटीस संदर्भात विचारले असता मी याबाबत ऐकले आहे अशा नोटीस पाठवल्या आहेत, अशा जर नोटीस आल्या असतील तर मी पुराव्यासह नक्कीच उत्तर देईल. सध्याचे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार आहे हे सगळ्यांना महिती आहे. असे जर नसते तर ज्यांच्या वर भ्रष्टाचाराचे, लुटमारीचे आरोप आहेत ते सरकारमध्ये सामील झाले नसते. माझ्या म्हणण्याला तो आधार आहे. राहुल कुल, राधाकृष्ण विखे पाटील, झाकीर नाईक कडून घेतलेला फंड, दादा भुसे अशी अनेक प्रकरणे मी दिले आहेत. अब्दुल सत्तार यांचे प्रकरण किती मोठे आहे, हे गुन्हेगार नाहीत का? यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जात नाही का याचे उत्तर द्यावे मला नोटीस पाठवणाऱ्यांनी आधी त्यांना नोटीस पाठवा त्यांना चौकशीला बोलवा मग बघतो असे आव्हान दिले. निष्कलंक संदर्भात बोलताना चर्चा होऊ द्या, अधिवेशनात चर्चा तर होणारच काही हरकत नाही. आजच्या सामनात मी लिहिलेले रोखठोक वाचा कलंक शब्दाचा अर्थ कळेल, त्यांच्या फार जिव्हारी लागले आहे.सत्य आरपार पोचले आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा संजय राऊत यांनी केली.
Post a Comment