सध्या टोमॅटोचे भाव खूप वाढले आहेत. अशा स्थितीत टोमॅटो चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. असाच काहीसा प्रकार कर्नाटकात घडला आहे. येथे एका जोडप्याने टोमॅटोने भरलेला ट्रकच लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या जोडप्याला तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांनी चोरी केलेल्या ट्रकमध्ये २.५ टन टोमॅटो होते. दोघांनी टोमॅटो घेऊन बाजारात विकले आणि रिकामा ट्रक टाकून पळ काढला. अटक करण्यात आलेल्या जोडप्याचे नाव 28 वर्षीय भास्कर आणि त्याची पत्नी सिंधुजा (26) आहे. या जोडप्यावर ट्रक चालकांकडून पैसे उकळणे आणि महामार्गावर दरोडा टाकण्यात आल्याचाही आरोप आहे.मलेश हा चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर येथील शेतकरी आहे. 8 जुलै रोजी तो चेन्नई येथे टोमॅटोने भरलेल्या ट्रकमध्ये टोमॅटो विकण्यासाठी जात असताना त्याला भास्कर आणि सिंधुजा यांनी आपल्या गाडीला धडक दिल्याचे त्याने सांगितले. यानंतर दोघांनी त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. त्याने पैसे न दिल्याने त्याला बेदम मारहाण करून अपहरण करण्यात आले. नंतर त्यांनी मलेशला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले आणि पैसे घेतल्यानंतर देवनहळ्ळीजवळ फेकून दिले.या दोघांनी ट्रकसह तेथून पलायन केले. त्यानंतर त्यांनी चेन्नई गाठले आणि तेथे संपूर्ण टोमॅटो विकले. यानंतर ट्रक बेंगळुरूमधील पेन्याजवळ सोडून नंबर प्लेट नसलेल्या वाहनात बसून पळून गेले.शेतकरी मलेश हिरीयुरहून कोलारला टोमॅटो घेऊन जातात. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई केली आणि तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातील वानियांबडी शहराजवळ या जोडप्याला अटक केली. या प्रकरणातील अन्य तीन संशयित रॉकी, कुमार आणि महेश अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे.
Post a Comment