मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन (17 जुलै) पासून सुरु झाले आहे. हे अधिवेशन 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे- फडणवीस - पवार सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. दरम्यान, अजित पवार यांनी सत्तेतील आमदारांनाच निधी घसघशीत दिल्यानं विरोधी पक्षातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे, आज विरोधीपक्षनेता कोण हे ठरणार आहे. आज अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यात पहिल्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शेतकरी मदतीवरुन आमनेसामने आले. मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर विरोधक आक्रमक होत, सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलं.दरम्यान, विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत सरकार प्रत्येक बाबींवर लक्ष ठेऊन आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्याठिकाणी मदतकार्य वेगाने सुरु आहे. आपत्तीग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत धान्यवाटप करण्यात येत आहे. या मदत कार्यात कोणताही भेदभाव करण्यात येत नाही. आपत्तीत असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहिल. असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. यावर विरोधी पक्षतील काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले की, सध्या आमदारांना निधी वाटपाची चर्चा सुरु आहे. पण हे सर्व बाजूला ठेवून सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे, कारण शेतकरी हा महत्त्वाचा आहे, त्याच्या यातील अश्रू आपण पाहिले पाहिजेत.अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या शेतकऱ्यांना व आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत धान्यवाटप करण्यात येत आहे. या मदत कार्यात कोणताही भेदभाव करण्यात येत नाही. असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहात सांगितल्यानंतर, पाच हजारांने काही होणार नाही. शेतकऱ्यांचे नुकसान मोठे आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना ताबडतोब १० हजारांची मदत सरकारने केली पाहिजे, अशी मागणी भाजपा आमदार संजय कुटे यांनी केली. तर आणि याबाबत मी आ सभागृहला तसा निवेदन असल्याचं उपमुख्यंत्री अजित पवार म्हणाले
Post a Comment