नवी दिल्ली : बेंगळुरू येथे १७-१८ जुलै रोजी होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीत सामील होणाऱ्या पक्षांची संख्या २४ झाली आहे. पाटण्यात झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत १५ पक्ष एकत्र आले होते. बंगळुरूच्या बैठकीला रालोदचे जयंत चौधरी देखील उपस्थित राहणार आहेत, जे मागील बैठकीला उपस्थित नव्हते.
या बैठकीला आम आदमी पक्षही उपस्थित राहणार असला तरी दिल्ली अध्यादेशाच्या मुद्द्यावरून 'आप' आणि काँग्रेसमध्ये अजूनही तणाव कायम आहे. दिल्ली अध्यादेशाबाबत काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
हे पक्ष बेंगळुरू येथील बैठकीला राहणार उपस्थित 1. कांग्रेस2. टीएमसी3. डीएमके4. आप5. जेडीयू6. आरजेडी 7. सीपीएम8. सीपीआई9. एनसीपी10. शिवसेना11. समाजवादी पार्टी12. नेशनल कॉन्फ्रेंस13. पीडीपी14. सीपीआई एमएल15. जेएमएम16. आरएलडी17. आरएसपी18. आईयूएमएल19. केरल कांग्रेस एम20. वीसीके21. एमडीएमके22. केडीएमके23. केरल कांग्रेस (जे)24. फॉरर्वड ब्लॉक विरोधी पक्षांच्या या बैठकीला सोनिया आणि राहुल गांधीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात पाटण्यात सर्व विरोधी पक्षांची बैठकीनंतरची ही विरोधी पक्षांची दुसरी बैठक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी १८ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीपूर्वी सर्व विरोधी पक्षांना डिनरसाठी आमंत्रित केले आहे. आम आदमी पक्षालाही निमंत्रित करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जुलैला होणाऱ्या या बैठकीच्या एक दिवस आधी सोनिया गांधी या डिनरचं आयोजन करू शकतात.
Post a Comment