मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचा पुढाकाराने २४ वर्षांनंतर पुन्हा कर्मचारी सेवेत रुजू



सोलापूर : जगताप कर्णबधिर विद्यालय ता. तुळजापूर  जिल्हा.उस्मानाबाद या शाळेत 1997 पासून कायमस्वरूपी सेवेत असणारे प्रभाकर गुरव (लिपिक) हरी सरक (काळजीवाहक) या दोन कर्मचाऱ्यांना संबंधित संस्थेच्या संस्थापक यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कोणत्याही प्रकारची चौकशी समिती गठीत न करता कायमस्वरूपी नोकरीत असणाऱ्या  दोन कर्मचाऱ्यांच्या जागेवर पैशाचा आर्थिक व्यवहार करून नव्याने दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून अन्याय केला होता.1999 सालापासून या दोन कर्मचाऱ्यांना शालेय कामी येऊ दिले जात नव्हते, सदर कर्मचाऱ्यांनी 1999पासून ते गेले सहा महिन्यापूर्वी अनेक प्रकारच्या संघटनेकडे जाऊन न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याही संघटनेने त्यांना न्याय दिला नाही.

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटॉन शिक्षक संघटना सोलापूर यांच्याकडे सदर दोन कर्मचारी आपली 24 वर्षांची व्यथा घेऊन आले व  सदरच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाचा कागदोपत्री अभ्यास करून संबंधित विभागाचे दिव्यांग आयुक्त मा.ओमप्रकाश देशमुख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे संघटनेने वरील दोन कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संबंधित संस्थेने उस्मानाबाद जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, प्रादेशिक उपायुक्त - लातूर यांनी कशा प्रकारचा गोलमाल करून अन्याय केला आहे या सर्व बाबी कागदोपत्री दिव्यांग आयुक्त यांच्या निदर्शनास सुनावणी घेऊन दर्शविण्यात आल्या.मा.दिव्यांग आयुक्त देशमुख साहेब यांनी संघटनेने उपस्थित केलेले सर्व डॉक्युमेंटरी इव्हिडन्सच्या आधारे व संघटनेने उपस्थित केलेल्या कायद्याच्या नियमाद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत घेण्याची मागणी दिव्यांग आयुक्त यांच्यासमोर करण्यात आली.सुनावणीच्या आधारे दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख साहेब - महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संबंधित दोन कर्मचाऱ्या वर नियमबाह्य अन्याय करण्यात आला आहे ही बाब मान्य करून संबंधित दोन कर्मचारी प्रभाकर गुरव (लिपिक) यांना एस.इ.सी डी स्कूल अँड टॉप हिल, सायन कोळीवाडा, जिल्हा - मुंबई या ठिकाणी समायोजित आदेश देण्यात आला. व हरी सरक (काळजीवाहक) यांना बन्सीलाल मोहनलाल मुथा मूकबधिर विद्यालय, तालुका - जुन्नर, जिल्हा - पुणे या ठिकाणी समायोजित आदेश देण्यात आला. 24 वर्षापासून नोकरीपासून वंचित असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटॉन शिक्षक संघटना सोलापूर यांनी न्याय देऊन 24 वर्षापासून वंचित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा पराक्रमच केला आहे.सन 2005 नंतर भारतातील शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना भारत सरकारने बंद केलेली आहे त्याची अंमलबजावणी भारतातील सर्वच राज्यांनी केलेली आहे.या दोन कर्मचाऱ्यांना 1997 पासून 2023 पर्यंत चा सर्व वेतन वाढीसह व दोन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळवून देण्याचे काम प्रोटान शिक्षक संघटना सोलापूर यांनी केले आहे.प्रोटान शिक्षक संघटनेने जी  कार्यतत्परतां ह्या प्रकरणात दाखवली त्यामुळे ह्या  दोन कर्मचाऱ्यांच्या संसाराचा सुखाचा मळा फुलवण्याचं काम संघटनेने केलं आहे.अनेक संघटना फक्त कागदावर असून भूलथाप देऊन कर्मचाऱ्यांचे फसवणूक करून आर्थिक सोषण करतात पण मूलनिवासी व प्रोटॉन कर्मचारी संघटना आमच्या साठी आणि भविष्यात इतरांसाठी देखील खऱ्या अर्थाने न्याय देणारी संघटना ठरेल असे मत २४ वर्षांनंतर पुन्हा सेवेत  रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.



0/Post a Comment/Comments