डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची स्वागत कमान जमीनदोस्त करणाऱ्या ग्रापंचायत विरोधात,सांगलीच्या दीडशे कुटुंबांनी गाव सोडलं,लाँग मार्च सुरु



सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथील बौध्द समाज गाव सोडून मुंबईकडे रवाना झाला आहे.सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब लॉन्ग मार्च करत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.एका महिन्यांपूर्वी गावात भरण्यात येत असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आली. त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायत विरुद्ध बौध्द समाज असा विरोध सुरू झाला होता.यातून आता बौध्द समाजाने गाव सोडण्याचा निर्धार करत गाव सोडले आहे.यामध्ये चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिक देखील सहभागी झाले आहेत. घरांना कुलुप लावत बॅगा भरुन हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग येथे बौध्द समाजाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान उभारण्यात येत होती.बेडग ग्रामपंचायतीने कमान बांधण्यासाठी परवानगी देखील दिली होती.मात्र, १६ जून रोजी कामन बेकादेशीर असल्याचं ठरवत,ग्रामपंचायतीनं बांधकाम सुरू असलेली कमान पाडून टाकली.यानंतर जिल्ह्यातील आंबेडकर प्रेमींनी याला विरोध केला होता.बांधकाम पाडल्यानंतर गावात तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते.त्यानंतर कमान पाडणाऱ्या सरपंचासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत बेडग ग्रामस्थांसह जिल्ह्यातल्या समस्त आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले होते.प्रशासनाकडून सरपंच उमेश पाटील यांच्यासह संबंधितांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कमान उभारु दिली जात नाही, त्याला विरोध होतोय आणि न्याय मिळत नाही,या भावनेतून बेडग ग्रामस्थांनी थेट गाव सोडण्याचा निर्धार केला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं.बौध्द समाजातील कुटुंबांनी आता या प्रश्नी गाव सोडले आहे. सांगलीमध्ये न्याय मिळत नाही, न्याय मिळावा म्हणून आता थेट मुंबईकडे हे बौध्द बांधव लॉंग मार्च काढत निघाले आहेत. मुलं-बाळ, जनावरं,संसार उपयोगी साहित्य घेऊन गाव सोडून मंत्रालयाकडे चालत रवाना झाले आहेत. बेडग गावातून दुसऱ्या गावात पुनर्वसन करावं, अशी मागणी देखील डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकर स्वागत कमान बचाव कृती समिती, सांगलीचे महेश कांबळे यांनी केली.



0/Post a Comment/Comments