अमरावती : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमची'दाभोलकरांसारखी गत करू,अशी धमकी देण्यात आल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे प्रकरणात अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरुन त्यांना धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.भिडे यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यांना पोलिस सुरक्षा देण्यात येत असून आपल्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर राहील, असे त्या म्हणाल्या. धमकीनंतर ठाकूर यांच्याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यशोमती ठाकूर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनाही धमकी देणारा ई- मेल काल रविवारी आला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शो सुरु आहे. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Post a Comment