धरणगाव तालुक्यातील साळवे येथे ना.गुलाबरावजी पाटील पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री,महाराष्ट्र राज्य. यांच्या प्रेरणेने व प्रतापराव पाटील यांच्या संकल्पनेतून साळवे इंग्रजी विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक गरीब गरजू विद्यार्थ्याला अर्धा डझन वहयां भेट देण्यात आल्या. मुख्याध्यापक ए. एस पाटीलसर यांच्या हस्ते व ज्येष्ठ शिक्षक सुधाकर मोरे सर यांनी विद्यार्थ्यांना सहा सहा वह्याचा गठ्ठा वाटप केला. यावेळी जी. व्ही नारखेडे, नीता पाटील मॅडम, ए .वाय शिंगणे, एस .पी तायडे,एस. व्ही राठोड व इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वह्या मिळाल्याच्या आनंद व्यक्त केला आणि मान्यवरांचे आभार मानले तसेच अभ्यास करण्याच्या संकल्प यावेळी विथार्थ्यानी केला.अश्या लहानशा सामजउपयोगी कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा व ऊर्जा मिळते अशी भावना मुख्याध्यापकांनी यावेळी व्यक्त केली.शैक्षणिक साहित्य उपक्रम राबविणाऱ्या प्रतापराव पाटील यांचे देखील आभार सुधाकर मोरे यांनी मानले
Post a Comment