अमरावती : नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळं सतत चर्चेत असणारे आणि नेहमी वाद ओढावून घेणारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं त्यांच्या या नवीन वादग्रस्त वक्तव्यामुळं पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता, असून यामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे खळबळजनक वक्तव्य श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केले आहे. भिडेंच्या या नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.भिडे हे वादग्रस्त वक्तव्यामुळे यापूर्वीही ते अनेकवेळा चर्चेत आले आहेत. त्यांनी विविध विषयांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं मोठे वाद यापूर्वी झाले आहेत. अमरावतीतील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भिडे म्हणाले की, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते. त्यांचे गांधींची पुत्र आहेत, असं भिडे म्हणाले. याआधी देखील भिडेंनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.याआधी देखील भिडेंनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. महिलांनी टिकली लावू नये. आंबे खाल्यानं महिलांना संतती प्राप्त होते. आदी वक्तव्य भिडेंनी केली आहेत. पुढे बोलताना भिडे म्हणाले की, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते. त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले. तसेच याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला. मात्र भिडेंच्या या नवीन वक्तव्यामुळं मोठा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Post a Comment