नवी दिल्ली:दिल्ली अध्यादेशाविरोधात काँग्रेसने आज आम आदमी पार्टीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आम आदमी पक्षाने मोठी घोषणा करताना 18 जुलै रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या विरोधी एकता बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी ही माहिती दिली. मीडियाशी बोलताना राघव चढ्ढा म्हणाले की, काँग्रेसने या अध्यादेशाचा निषेध नोंदवला आहे.यानंतर आम आदमी पक्षाने बंगळुरू येथे होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
18 जुलै रोजी आप महाविरोधी पक्षाचे भाग होणार आहे
दिल्ली अध्यादेशाविरोधात काँग्रेसने आम आदमी पार्टीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आम आदमी पार्टीनेही पीएसीच्या बैठकीनंतर मोठा निर्णय घेतला. 17-18 जुलै रोजी होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहण्यास पक्षाने होकार दिला आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी सांगितले की पीएसीच्या बैठकीत प्रत्येक पैलूंवर चर्चा झाली. दिल्लीचा अध्यादेश देशविरोधी आहे. या अध्यादेशाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य मागितले आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केले, काँग्रेस पक्षानेही या अध्यादेशाचा निषेध नोंदवला आहे. आम आदमी पक्ष 17-18 जुलै रोजी बेंगळुरू येथे होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी होणार आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने त्यांचे संयोजक अरविंद केजरीवाल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
अध्यादेशावर काँग्रेस 'आप'ला पाठिंबा देईल
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, ही बैठक पाटणा येथे झालेल्या बैठकीचा पुढचा भाग आहे, आम्ही 2024 च्या निवडणुकीसाठी पुढे जाऊ. अध्यादेशाच्या मुद्दयावर ते म्हणाले की, दिल्ली सरकारच्या केंद्राच्या अध्यादेशाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही त्याला विरोध करू. यापूर्वी काँग्रेसमधील अनेक नेते याला विरोध करत होते. शीला दीक्षित यांची मुले संदीप दीक्षित आणि अजय माकन हे 'आप'ला पाठिंबा देण्याच्या विरोधात होते.
Post a Comment