बनावट बियाणांच्या मुद्यावर आक्रमक होत,विरोधकांचा विधानसभेत सभात्याग


मुंबई : खते आणि बनावट बियाणांच्या मुद्यांवरुन विधानसभेत बुधवारी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. या मुद्यावरुन विरोधकांनी सभात्याग केला. बोगस बियाणांच्या प्रकरणांत किती जणांवर कारवाई केली, याची माहिती देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली तसेच खतांच्या वाढत्या किंमतीवरही त्यांनी सरकारला जाब विचारला. बोगस बियाणांच्या संदर्भात अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, बोगस बियाणांच्या संदर्भात 1966 चा कायदा आहे. बीटी कॉटनचा कायदा आला. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक होते आहे. मात्र, आता त्यासाठी आता त्यासाठी आपण कायदा आणत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 1966 च्या कायद्यात असा गुन्हा केला तर 500 रुपयांचा दंड आहे. दुसऱ्यांदा गुन्हा केला तर एक हजार रुपयांचा दंड आणि त्यानंतरही गुन्हा केला तर परवाना रद्द अशी तुटपुंजी तरतुद आहे. बोगस बीयाणांच्या बाबतीत कारवाई करण्यासाठी समिती कठीण केलेली आहे. आता बीटी कॉटन प्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे मुंडे म्हणाले. आम्ही सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. वाढलेल्या खतांच्या किंमतीच्या मुद्यावरुन देखील विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. आंतरराष्ट्रीय पातळीवर खतांच्या किंमती एवढ्या कमी झालेल्या आहेत. मग या ठिकाणी का होत नाहीत? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी सरकारला केला.

0/Post a Comment/Comments